माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद

0
46

साईमत ठाणे प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा आज (५ ऑगस्ट) ६० वा वाढदिवस आहे परंतु, आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. वाढदिवस साजरा न करता अज्ञातस्थळी जाण्याबद्दल स्वतः आव्हाड यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ५ ऑगस्ट माझा वाढदिवस लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असते. वर्षभराची ताकद मला तारखेला मिळते पण मला माफ करा. या ५ तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

आव्हाड यांनी म्हटले आहे की, देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफूटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळे बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावे असे मला अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकद आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरीही मला माफ करा. मी आज रात्री १२ वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वतःचा फोन बंद करून अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here