साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून करणाऱ्या संशयित आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील या आरोपीला फास्ट ट्रॅक जलद गतीचा न्यायालयात खटला चालवून, यासाठी सरकारी वकील म्हणून ॲड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक करुन ६ महिन्यात फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी
उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी, शिवसेना, युवासेना धरणगाव तालुक्याच्यावतीने करण्यात येऊन अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख भागवत चौधरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, जनाबाई पाटील, रत्ना धनगर, ज्योत्स्ना भाटिया, किरण माळी, उषा वाघ, हेमांगी अग्निहोत्री, सुनिता चौधरी, निकिता बागुल, लता पाटील, गायत्री पाटील, जयश्री साने, माधुरी पाटील, अनिता पाटील, माधुरी बत्तीसे, शुभांगी नलवाले, खटाबाई नेहते आदी महिला उपस्थित होत्या.
