साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा ख्यातनाम सनदी लेखापाल (सीए) शेखर सोनाळकर (वय ७२ )यांचे शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले.
सत्तरच्या दशकातील लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जडण-घडण झालेले शेखर सोनाळकर यांनी आणीबाणीत कारावास देखील भोगला. वासंती दिघे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. यानंतर गेल्या सुमारे चार दशकांपासून जास्त काळ हे दाम्पत्य राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत होते.
शेखर सोनाळकर यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ढासळली होती. शुक्रवारी पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जळगावातील अनेक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताचे काम केले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.