रस्त्यांच्या कामासाठी नागरिकांनी घेतली आमदारांची भेट

0
13

साईमत पाचोरा प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रस्त्यांच्या कामांसाठी व राहिलेल्या ओपन स्पेस सुशोभीकरण करण्याच्या कामांसाठी जितेंद्र जैन यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेत समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि याकामी आ.किशोर पाटील (Kishorappa Patil ) यांची नुकतीच भेट घेतली. प्रत्येकाने आमदारांकडे व्यथा मांडतांना मन मोकळे केले.

यावेळी पुढील दीड महिन्यात सर्व रस्त्यांची कामे सुरू होतील, असे ठोस आश्वासन आमदारांनी सगळ्यांना दिले. रस्ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे जितेंद्र जैन यांनी सांगितले. यावेळी भरत शेंडे, विशाल राजपूत, कमलेश सुराणा, महेंद्र पाटील, फईम शेख, सुनील पाटील, आदेश संघवी, सचिन संघवी, यश संघवी, रोशन पारख, चेतन पवार यांच्या समवेत प्रभागातील ४० ते ५० नागरिक उपस्थित होते.

येथील भडगाव रोड परिसरातील सर्वात जुनी वस्ती असलेली संघवी कॉलनी, मानसिंगा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, गाडगेबाबा नगर, पोलीस वसाहत मागील परिसर, यशोदा नगर याठिकाणी रस्त्यांची अवस्था खूपच बिकट आहे. काही ठिकाणी भुयारी गटारींच्या कामानंतर संपूर्ण रस्त्याचे दोन तुकडे झाले. गाडी चालविणे आणि पायी चालणे म्हणजे कसरत ठरत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे आहेत. त्यामुळे येथे सातत्याने लहान-मोठे अपघात होत असतात. पाचोरा शहराच्या सर्व नवीन वसाहतीत सुद्धा रस्ते झाले. फक्त हाच परिसर दुर्लक्षित कसा? असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here