साईमत मलकापूर प्रतिनिधी
अमृत भारत योजनेच्या अंतर्गत मलकापूर रेल्वे स्थानकाचा विकास होणार असल्याची माहिती खा. रक्षाताई खडसे यांनी दिली आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देशभरातील ५०६ रेल्वे स्टेशनसह या स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत.
अमृत भारत योजनेंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील मलकापूर रेल्वे स्टेशनची निवड झालेली असून, स्टेशनवर विविध विकास कामे करणेसाठी रू.१८.५१ कोटी मंजूर झालेले असुन, ६ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देशभरातील ५०६ रेल्वे स्टेशनसह या स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत. यात मलकापूर स्टेशन वर खासदार रक्षाताई खडसे व माजी आमदार चैनसुख संचेती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अमृत भारत योजनेंतर्गत मलकापूर रेल्वे स्थानकाचे छत नूतनीकरण, १२ मीटर फूट ओव्हर ब्रीज, डिजिटल व्हिडिओ स्क्रीन, पार्किंग व्यवस्था, वेटींग रुम नूतनीकरण, २ लिफ्ट, आधुनिक प्रसाधनगृह, दक्षिण बाजूने नवीन प्रवेशद्वार अशी विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मलकापूर स्टेशनवर प्रवाश्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.