बहुलखेड्यात बोगस डॉक्टर -आरोग्य पथकाचे पंचनामा बोगस डॉक्टर भूमिगत

0
15
बहुलखेड्यात बोगस डॉक्टर -आरोग्य पथकाचे पंचनामा बोगस डॉक्टर भूमिगत

साईमत सोयगाव प्रतिनिधी

सोयगावच्या जवळ असलेल्या बहुलखेडा गावात बोगस डॉक्टर असल्याची कुणकुण तालुका आरोग्य विभागाला लागताच सोमवारी पथक प्रमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांचा पथकाने बहुलखेडा गाठताच त्या बोगस डॉक्टरने भूमिगत होऊन आरोग्य विभागाच्या पथकाला गुंगारा दिला दरम्यान आरोग्य विभागाने त्या डॉक्टर च्या दवाखान्याच्या बंद अवस्थेत पंचनामा करून अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पाठविला आहे.

सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या छोट्याशा गावात ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षित पणाचा व माणूसकीचा फायदा घेत मागील काही वर्षांपासून एक बोगस डॉक्टरने एका पत्र्याच्या शेडमध्ये आपला दवाखाना मोठ्या दिमाखात थाटला होता.बिनधास्तपणे औषधांचा वापर करुन आपण दवाखान्यासमोर कोणताही बोर्ड न लावता सर्रासपणे इंजेक्शन देण्याचा गोरखधंदा या डॉक्टरने चालविला होता या (मुन्नाभाई एम. बी. बी. एस.) अश्या डॉक्टर ची कुणकुण लागताच सोमवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांच्यासह आरोग्य पथक गावात जाताच हा मुन्नाभाई फरारी होऊन त्या डॉक्टर ने पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी झाला मात्र तालुका आरोग्य पथकाने थेट बंद अवस्थेत असलेल्या दवाखान्यचा पंचनामा करून अहवाल पाठविला आहे.फार्मात दवाखाना चालवत असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे सुज्ञ व जानकार लोकांमधून चर्चीले जात आहे.

सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा या गावात पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दवाखान्यात कोणत्याही रुग्णांच्या सुविधा नसल्याचे या पथकांनी सांगितले हे मुन्नाभाई एवढ्यावरच थांबले नसून ते बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करत असून साधी, साधी लक्षणे जाणवली तरी रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी नको ते वर्णन करुन गरज नसतांना इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, रक्त, लघवी, थुंकी तपासणी करायला लावून संबंधित लॅबोरेटरी संचालकांकडून कमीशन लाटणे तसेच वारेमाप औषधे लिहून देत औषधी विक्रेत्यांकडून कमीशन लाटणे असे प्रकार सर्रासपणे करत असल्याचे ग्रामस्थांनी पथकाला सांगितले संबंधित डॉक्टर हा बोगस डॉक्टर असल्याचे बहुलखेडा गावातील सुज्ञ नागरिकांनी सांगत या बोगस डॉक्टरचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा या बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एखाद्या रुग्णांच्या जीवावर बेतू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.दरम्यान याप्रकरणी सोमवारी तालुका आरोग्य विभागाने बहुलखेड्यात धाव घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांची बहूलखेडा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चो केली यावेळी बोगस डाक्टर चा दवाखाना बंद अवस्थेत आढळून आला.त्यामुळे अशा प्रकारचे गावामध्ये कुनिही डाक्टर आल्यास प्रा.आ.केंन्द्र जरंडी किंवा तालुका आरोग्य आधिकारी कार्यालय सोयगांव यांना कळवावे.असे आवाहन आरोग्य पथकांनी केले.या वेळी तालुका पर्यवेक्षक.श्री.एच एल दूधे आरोग्य सेवक श्री.पंडीत.श्री.डी.ए.झोंड हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here