साईमत मुंबई प्रतिनिधी
राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे बंड करून आलेल्या आमदारांवर निधीचा चांगलाच वर्षाव केला आहे. त्यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघा मधील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहूनही अधिक निधी मंजूर केला आहे. तसेच शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांनाही निधी मंजूर उपलब्ध करण्यात आला आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनकडून चांगलीच टीका करताना दिसून येत आहे . आता या सर्वांवर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे .
विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, माझ्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. माझ्याकडील खात्यामार्फत सर्वांना निधी देण्यात आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना किती निधी दिला? हे सर्व नावांसह मी सांगू शकतो. संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या जिभेलात हाड नाही. ते वाट्टेल ते बोलतात, यांच्या बोलण्याकडे आता कोणी गांभीर्याने सुद्धा घेत नाही.
