श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन उत्साहात

0
45

जळगाव ः प्रतिनिधी
जैन दर्शनात श्री तिलोक छंद संग्रहाचे एक विशेष महत्त्व सर्वश्रुत आहे. भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा मुद्रित आणि श्री जैन रत्न पुस्तकालय अहमदनगर द्वारे प्रकाशित श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन हस्ती हीरा नगर स्थित जैन भवन येथे युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री महेन्द्रऋषीजी म. सा., आदि ठाना ५ तथा महासति परमपूज्य मंगलज्योतिजी म. सा. आदि ठाना ३ यांच्या पावन उपस्थितीत तसेच संघपति दलिचंदजी जैन,उद्योगपती अशोकभाऊ जैन, पूर्व महापौर प्रदीप रायसोनी, नगरसेवक अमर जैन, नेमिचंद चोरड़िया, स्वरूप लुंकड, महावीर बोथरा, मनिष लुंकड आणि नितीन चोपड़ा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी संघ सेवाभाव, सहकार्याकरिता प्रदीपभाऊ रायसोनी आणि अशोकभाऊ जैन यांचा सत्कार ही करण्यात आला.या पुस्तकाचे धर्मप्रेमी परिवारामध्ये वितरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पूज्य गुरूदेव श्री यांनी श्री तिलोक छंद संग्रहाचे स्वाध्यायात महत्त्व विषद केले आणि आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या साधनेत हे जीवनपर्य्ंत समाहित होते, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. पुढे ते म्हणाले की, जळगाव श्री संघाची भारतवर्षमध्ये विशेष महानता राहिली आहे. मागील काळात श्रद्धेय भवरलाल जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्‍वरबाबू जैन, स्वर्ण व्यवसायी रतनलाल बाफना तथा सेवादास दलुभाऊ जैन यांनी यात सातत्य राखले. या सर्वांनी आपल्या निष्ठापूर्वक व्यवहाराने आणि सर्वसमावेशकतेने ही परंपरा प्रवाहित केली. जैन भवन येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात प्रशासनिक सूचनांचे पालन करत धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here