साईमत सोयगाव प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ३७० किल्ले सर करण्यासाठी केरळहून निघालेल्या शिवभक्त युवक एम. के. हमरासचे सोयगाव शहरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी भाऊ काळे,व दैनिक बाळकडू चे पत्रकार विजय काळे यांनी स्वागत केले. केरळहून तो निघाला असून या सायकल राईडमध्ये तो सर्व किल्ल्यांना भेटी देवून आपली ही आगळी वेगळी सफर पूर्ण करणार आहे.
शिव भक्त हमरास हा गेली आठ महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होवून सायकलवरुन गडकोटांना भेट देत आहे. त्याने महाराष्ट्रातील ११७ किल्यांना भेट दिला. यावेळी आदी शिवप्रेमी त्यांचे स्वागत करण्यास उपस्थित होते. हमरासनी छ.संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी,बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत.
या किल्ल्याच वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार आणि किल्ल्यावर असलेली पाण्याची २५ हून अधिक टाकी.सुतोंडा किल्ल्याच्या डोंगरात असलेल जोगवा मागणारीच लेणही पहाण्यासारख आहे. तसेच सोयगाव शहराच्या लागून असलेला वाडी किल्ला सुंदर असल्याचं मत व्यक्त केले यावेळी सोयगाव शहरात व बनोटी येथे या शिवभक्ताचे स्वागत केले यावेळी रघु परदेशी,शरीफ शेख,गणेश भोई,सागर पाटील, नाना सोनार, कैलास पाटील, नारायण चौधरी, नितीन वेल्हे, रवी पाटील, बबलू शेख, अजित पाटील, दादा पवार, समाधान गरुड, अरुण पाटील, यांनी केले