साईमत जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील शेतकरी कैलास वडाळे याच्या खून प्रकरणी खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी रमेश मोरे रा.वडाळी यास न्यायालयाने दि.३० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी ची मुदत संपल्याने आरोपी रमेश मोरे यास आज दि.३० रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.न्यायालयीन कोठडी मिळाल्याने संशयित आरोपी रमेश मोरे याची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली.
दरम्यान पोलिस कोठडीत असतांना संशयिताने वाकोद बसस्थानक परिसरात असलेल्या खुशबू कापड दुकानातून पांढरा कापड खरेदी केला होता. तसेच नरेंद्र मेडिकल वरुन नारळी दोरीचे दोन बंडल खरेदी केले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वडाळी येथील भावड्या नामक इसमाची मोटरसायकल घेतली होती. ती मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
पहुर पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी संशयित आरोपी ची जिल्हा कारागृहात जरी रवानगी झाली तरी या गुन्ह्याचा तपास सुरूच राहील अशी पत्रकारांना माहिती दिली.