साईमत मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला रवाना झाले. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बेस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार ?
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जलेच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युती सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर राहणार आहे.
शिंदे गटाला केंद्रात किती जागा मिळणार ?
महाराष्ट्रात भाजपसोबत हातमिळवणी करून सतत आलल्या शिंदे गटाला मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात २ जागा मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. त्यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असून त्या जागी कोणाची वर्णी लावायची? हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोडण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू होताच, राज्यातील भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली अर मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. त्यामळे शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या आमदाराला संधी मिळणार? हेच पाहणे आत्मक्याचे ठरणार आहे