Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नववर्षानिमित्त सुधर्माचा स्तुत्य उपक्रम ; शहरातील १० कचरा वेचक महिलांना किराणा वाटप
    जळगाव

    नववर्षानिमित्त सुधर्माचा स्तुत्य उपक्रम ; शहरातील १० कचरा वेचक महिलांना किराणा वाटप

    saimat teamBy saimat teamApril 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या दिवशी सुधर्मा संस्थेने शहरातील अत्यंत गरीब अशा दहा कचरावेचक महिलांना किराणा सामानाचे वाटप केले.
    कोरोनामुळे समाजातील सर्व जणांचे आर्थिक चक्र थांबले आहे.या गरीब महिलांना यामुळे पुरेसा कचरा,प्लास्टिक कुठे आता मिळत नाहीत त्यामुळे अक्षरशः उपासमारीची त्यांच्यावर वेळ आली आहे.त्यामुळे या आर्थिक संकटात त्यांना किराणा वाटपची मदत देण्यात आली. त्यामध्ये गहू,तांदूळ,तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, बेसन, साखर,तेल,साबण, पोहे, गुळ, मटकी, शेंगदाणे, बिस्किट इत्यादी साहित्य देण्यात आले.
    यावेळी या सर्व महिलांना नवीन साडी देखील देण्यात आली. लाभार्थी महिलांमध्ये तांबापुरा येथील गंगाबाई सोनवणे,मंगलाबाई गायकवाड, किरणबाई पवार, आरती सोनवणे,माया सुर्यवंशी, कमलाबाई सोनवणे,कलाबाई सोनवणे, मंगलाबाई लोंढे,यांचा समावेश आहे. वाटप कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी काव्यरत्नावली चौकात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी या सर्व कचरावेचक महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत पाच-पाच महिलांना शिस्तशीर
    किराणा वाटप करण्यात आले.यशस्वीतेसाठी सुनिता नितीन तायडे यांनी सहकार्य केले. किराणा वाटप करून झाल्यानंतर या महिलांनी मनापासून आभार व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.