सोयगावचा आठवडे बाजार चिखलात; ग्राहकांची तारांबळ

0
16
सोयगावचा आठवडे बाजार चिखलात; ग्राहकांची तारांबळ

साईमत सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव शहरात झालेल्या रिमझिम पावसात पहिल्याच पावसात सोयगावच्या आठवडे बाजारात चिखलच चिखल झाला होता त्यामुळे गृहिणींना आठवडे बाजारात खरेदीसाठी मोठी तारांबळ उडाली होती बाजारात चिखलात पायी फिरणे अवघड झाले होते त्यामुळे मोठी गैरसोय झाली.

सोयगाव आठवडे बाजार शहरातील पंचायत समितीच्या मैदानात भरतो नगर पंचायतीकडे आठवडे बाहेरची देखभाल आहे परंतु नगर पंचायतीने या आठवडे बाजारच्या मैदानाची मॉन्सून पूर्व तयारीच केलेली नाही त्यामुळे पहिल्याच पावसात चिखलाचे साम्राज्य बाजारात पसरले होते त्यामुळे महिलांची चांगलीच कोंडी झाली होती.

दरम्यान सोयगाव च्या आठवडे बाजाराचा कर वसुलीची जबाबदारी नगर पंचायतीकडे आहे मात्र दुकानदारांना आठवडा बाजारात कोणतीही सुविधा मिळत नसुन पावसाळ्यात या आठवडे बाजारात चिखल होऊन गैरसोय होते मंगळवारी झालेल्या पहिल्याच रिमझिम पावसात बाजारात चिखल झाला त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांना चिखल तुडवीत बाजार करावा लागला होता याकडे मात्र आठवडे बाजाराची जबाबदारी असलेल्या नगर पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे..

भाजीपाला कडाडले
सोयगाव तालुक्यात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे त्यामुळे मंगळवारी भाजीपाल्याची दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होते मंगळवारी भाजीपालाचे दर वाढले असल्याने मोठी पंचायत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here