प. वि. पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची सुशोभन कार्यशाळा उत्साहात संपन्न

0
19
प. वि. पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची सुशोभन कार्यशाळा उत्साहात संपन्न

साईमत जळगाव प्रतिनिधी

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी या उद्दिष्टाने शालेय सुशोभीकरणाची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली असून सदर कार्यशाळेमध्ये सुशोभीकरण म्हणजे काय ? सुशोभीकरण कशा प्रकारे करावे व त्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा याविषयी मुख्या .धनश्री फालक यांनी मार्गदर्शन केले तर या सुशोधनासाठी वेळोवेळी लागणारे विविध साहित्य प्रत्यक्ष कसे तयार करावे याविषयी प्रात्यक्षिकातून उपशिक्षक योगेश भालेराव सर यांनी मार्गदर्शन केले.

शालेय वर्ग स्वच्छता करणे , पताका तयार करणे , फुलांचे हार तयार करणे , वॉलपीस तयार करणे तसेच चार्ट व शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षणही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी गुलाब , झेंडू , जाई , मोगरा सदाफुली इत्यादी फुलांचा तसेच आंब्याची पाने ,केळीची पाने , अशोक वृक्षाची पाने यांचा वापर करून सुंदर असे हार यावेळी तयार केले. सदर कार्यशाळेमध्ये इयत्ता 3 री च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here