साईमत जळगाव प्रतिनिधी
पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती रंधे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.माजी महापौर डॉ. अश्विन सोनवणे, सरिता ललित कोल्हे, नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, ॲड.अभिजीत जितेंद्र रंधे, नगरसेविका रेश्मा काळे, कुंदन काळ,े शोभा चौधरी, केशवराव म्हस्के, माजी नगरसेविका कमलताई म्हस्के, निशा पवार, शंतनु नारखेडे, हर्षल मावळे, शुभांगी बिराडे, संकेत कापसे, नारखेडे साहेब आदी उपस्थित होते.
त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे प्रकाश सोनवणे निरंजना तायडे लोकेश चौधरी पृथ्वीराज देशमुख संतोष भंगाळे मयूर देशमुख यांनी कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेतले..शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रमुख अतिथींना गोल्डन ट्री देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.शक्ती फाउंडेशनच्या या कार्यक्रमातून ऑक्सिजन देणारे झाड तसेच फळझाडे लावण्यात आले. जेणेकरून परिसरातील नागरिकांना मुलांना व पशु पक्षांना देखील लाभ घेता येईल.
शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून व आलेल्या सर्व प्रमुख अतिथींनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले व मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवली पाहिजे हा संदेश दिला.