साईमत नाशिक प्रतिनिधी
इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून नाशिकहून विमानसेवा सक्षमपणे सुरू करण्यात आली असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी पाच शहरांसाठीच्या सेवांचा 646 लोकांनी लाभ घेतला.इंडीगो कंपनीच्या माध्यमातून 1 जूनपासून सूरू करण्यात आलेल्या सेवांना प्रवाश्यांनी प्रतिसाद दिलेला असून अहमदाबाद, इंदौर, गोवा, हैद्राबाद व नागपूर या शहरांतून 358 प्रवाशी शहरात दाखल झाले आहेत.
तर 288 प्रवाश्यांनी या शहरांसाठी विमान सेवेचा लाभ घेतलेला आहे.त्यात प्रामुख्याने नाशिकहून जाणार्या विमानांपैकी अहमदाबादसाठीच्या दोन विमानांतून 74 प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. तर इंदौरसाठी 36 प्रवाशी, गोव्यासाठी 62 प्रवासी, हैद्राबादसाठी 65 प्रवाशी तर नागपूरसाठी 51 प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घेतला. तर विविध शहरांतून नाशिकला येणार्या प्रवाश्यांमध्ये प्रामुख्याने अहमदाबादच्या दोन विमानांतून 108 प्रवाशी, नागपूरहून 58 प्रवाशी, हैद्राबादहून 59 प्रवाशी, इंदौरहून 68 प्रवाशी तर गोव्याहून 65 प्रवाश्यांनी विमानातून नाशिक गाठले.