Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आपल्या फोनमध्ये या ५ गोष्टी होत असतील तर समजा आपला फोन हॅक झालय ; मोठा नुकसान देखील होऊ शकते
    क्राईम

    आपल्या फोनमध्ये या ५ गोष्टी होत असतील तर समजा आपला फोन हॅक झालय ; मोठा नुकसान देखील होऊ शकते

    SaimatBy SaimatApril 7, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एकीकडे आपले फोन अधिक स्मार्ट होत असताना नवनवीन अपडेट्स त्यात येत आहेत. त्यात सर्वकाही डिजीटल होत असल्याने मोठमोठे महत्त्वाचे व्यवहारही आजकाल फोनवरुनच होतात. त्यामुळे छोट्या मोठ्या पेमेंटपासून ते मोठमोठे व्यवहारही आजकाल फोन बॅकिंगमधून होत असतात. त्यात फोनच्या वाढत्या वापरामुळे आपले सर्व महत्त्वाचे डॉक्यूमेंट्सही फोनमध्ये असून अशा परिस्थितीत फोन हॅक झाल्यास मोठा तोटा होऊ शकतो. त्यात तुम्ही अॅपल युजर असाल तर कंपनीच्या दाव्यानुसार अॅपलच्या आयओएसमध्ये अँड्रॉइडपेक्षा जास्त सिक्युरिटी उपलब्ध आहे, पण याचा अर्थ आयफोन हॅक होऊ शकत नाही असा नाही. त्यामुळेच अॅन्ड्रॉईड किंवा आयफोन कोणताही फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर काही सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण त्यापूर्वी फोन हॅक झालाय हे कसं कळेल ते जाणून घेऊ…

    फोन सतत बंद/रिस्टार्ट होणं

     

    फोन हॅक होण्याचं एक लक्षण हे देखील आहे की जर तुमचा फोन सतत बंद होत असेल किंवा आपोआप रिस्टार्ट होत असेल तर तुमचा फोन हॅकर्सच्या ताब्यात आहे हे समजावं. याशिवाय, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनची सेटिंग्ज आपोआप बदलली आहे. तर याचा अर्थही असा होतो की, हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये प्रवेश केला आहे. अशावेळी डाउनलोड केलेली फाईल ताबडतोब तपासा किंवा फोन त्वरित फॉरमॅट करणं अधिकच चांगलं.

    बँकिंग व्यवहार झाल्याचे फेक मेसेज​

    फोन हॅक झालाय हे कळण्याचं आणखी एक मोठं लक्षण म्हणजे तुम्हाला न झालेल्या ट्रान्झॅक्शनचे मेसेज मिळू लागतात. बर्‍याच वेळा असं होतं की तुम्ही न घेतलेल्या गोष्टींच्या खरेदीचे आणि व्यवहाराचे मेसेज तुम्हाला मिळू लागतात. याचा अर्थ असा की कोणीतरी तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा बँकिंग तपशील फोन किंवा इतर गोष्टीच्या सहाय्याने हॅक करत आहे. असे झाल्यास ताबडतोब बँकेची मदत घ्या आणि संबधित खात्यातून व्यवहार बंद करा.

     

    फोन अचानक स्लो होणं​

    तुमचा स्मार्टफोन अचानक खूप स्लो चालत असेल तर काळजी घ्या. बर्‍याच वेळा हॅकर्स त्यांच्या चूकीच्या कामांसाठी तुमचा फोन हॅक करुन वापरतात.याशिवाय इंटरनेटचा स्पीड चांगला असतानाही फोनवर व्हिडिओ स्लो चालत असेल किंवा तुमचा डेटा जास्त वापरला जात असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.

    ​अँटीव्हायरस बंद

    फोन हॅक करण्यासाठी हॅकर्स कधीकधी अँटी व्हायरस आणि सुरक्षा सॉफ्टवेअर बंद करतात. तुमचा अँटी व्हायरस काम करत नसल्याची शंका असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त, नेहमी तुमचा इंटरनेट ब्राउझर तपासत राहा, कारण तुमच्या ब्राउझरमध्ये असणाऱ्या एक्स्टेंशन मुळे तुमच्या फोनची माहिती लीक होऊ शकते.दरम्यानअशी परिस्थिती टाळण्यासाठी फोनचे अॅप सतत अपडेट करत राहा.

    बॅटरी वेगाने संपत असल्यासही फोन झालाय हॅक

    जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक लवकर संपत असेल. तरीही तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कारण हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये कोणताही मालवेअर टाकला, तर तो फोनच्या बॅकग्राउंडमध्ये काम करतो आणि त्यामुळे बॅटरी अधिक जलद उतरते. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. एकतर तुम्ही फोन पूर्णपणे फॉरमॅट मारु शकता किंवा लवकरात लवकर फोन रिपेअर शॉप किंवा अधिकृत गॅलरीमध्ये जाऊ शकता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    CCTV Footage Surfaced : हॉटेलसमोरून गाय लांबविली ; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

    December 22, 2025

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025

    Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.