उमरगा येथे वर्षभरात सहा खून … कायदा व सुव्यवस्था बिघडली

0
14

साईमत लाईव्ह उमरगा प्रतिनिधी

उमरगा पोलीस स्टेशनचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक एम.ए.राठोड यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गेल्या आकरा महिन्यात उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारणपणे एका वर्षाच्या कालावधीत सहा खून, तर तितकेच खुनाचे प्रयत्न झाले आहेत तर हाणामाऱ्या, चोऱ्या, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी, जेष्ठ नागरिकांना फसवून सोने लूट करणे अशा घटनात वाढ झाल्याने लोकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमरगा शहर व आसपासच्या भागातील सर्व जाती – धर्मातील लोकांनी सामाजिक सलोखा जपत उमरगेकरांनी संपूर्ण राज्याला शांतताप्रिय तालुका असल्याचे संदेश दिला आहे. कांही अपवाद वगळता जातीय सलोखा अखंड असतो. मात्र गेल्या वर्षभरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम घालण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे. मात्र यंत्रणा कमी पडत आहे.
उमरगा तालुक्याच्या राजकिय, सामाजिक इतिहास पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक कटुता वाढली आहे. अलीकडच्या एका वर्षात कांही किरकोळ कारणावरून होणारे वाद, खुन, हाणामाऱ्याचे वाढते प्रकार, झुंडीने होणारी भांडणे यामुळे शांतताप्रिय शहर गुन्हेगारी शहर बनत चालले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here