शिंगायत येथील तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीस ४ दिवसांची पोलिस कोठडी

0
20
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर -सोनाळा शिवरस्त्यावर दि.२१रोजी सांयकाळी३ते४वाजेच्या सुमारास शिंगायत येथील तरुणाच्या निर्घृण  खून  प्रकरणी गावातीलच एका तरुणाच्या  जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या होत्या. आरोपीला आज दि.२३ रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दि.२६ पर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
     दारूच्या नशेत दि.२१रोजी शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ(वय३७) याची दगडाने ठेचून निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती .  या हत्येप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप (वय४१)  यांस शिंगायत येथून  ताब्यात घेऊन पहुर पोलिसांच्या ताब्यात देऊन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली होती. आज दि.२३रोजी त्यास जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दि.२६ पर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here