Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला
    यावल

    फैजपूर येथे आश्रय फाऊंडेशन तर्फे डॉ.कुंदन फेगड़े यांनी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला

    SaimatBy SaimatMarch 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

    फैजपूर शहरात यावल रावेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या आश्रय फाऊंडेशन कडून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    महिलांचा सन्मान हा स्तुत्य कार्यक्रम फैजपूर शहरातील शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ संपन्न झाला.या कार्यक्रमात यावल-रावेर तालुक्यातील १५ महिला व तीन महिला संघांचा सन्मान करण्यात आला.

    जागतिक महिला दिन सेवा पंधरवाडा निमित्त दि.19 रविवारी रोजी फैजपूर शहरात हा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्यधापिका शुभांगी महाजन होत्या तर प्रमुख उपस्थितीत आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,उपाध्यक्ष डॉ.विलास पाटील,सचिव डॉ. पराग पाटील,डॉ.राजेश चौधरी,डॉ.दिलीप भटकर,डॉ नितीन महाजन,डॉ.भरत महाजन,डॉ.प्रशांत जावळे, डॉ.ताराचंद सावळे,डॉ. निलेश पाटील डॉ.शैलेश खाचणे,डॉ.सोहन महाजन, डॉ.नितीन महाजन, डॉ.ताराचंद सावळे,हे होते या कार्यक्रमात यावल -रावेर तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात कौटुंबिक जबाबदारी अत्यंत सचोटीने पार पाडत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा गौरव करीत त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजात वावरणाऱ्या गरजूना आपली मदत व्हावी यासाठी सदैव धडपड करणाऱ्या महिलांना आपल्या कार्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी या उद्देशाने महिलांचा सत्कार करण्यात आला.दैनंदिन जीवनात होत असलेली धडपड विसरून समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या महिलांचे कार्य खरोखर मोलाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.या कार्यक्रमांची प्रस्तावना आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केली तर सूत्रसंचालन फैजपूर येथील शिक्षिका अश्विनी कोळी यांनी केले.या कार्यक्रमात जयश्री प्रदीप पाटील,रुबीना हसन तडवी, प्रिया विश्वास कुवर,धनश्री शिरीष पाटील,वैशाली विलास ताठे,किरण विवेक महाजनी,चंद्रनी अमित समर्थ,जयश्री अनिल पाटील, जयश्री हर्षल बोन्डे,सरला जाहऱ्या बारेला,डॉ.जागृती फेगडे,डॉ स्नेहल जावळे,डॉ. भाग्यश्री महाजन,डॉ.शीतल पाटील,डॉ.सोनम खाचणे, डॉ.संगीता महाजन,सौ. धनेश्री भटकर,डॉ.प्रीती सावळे,डॉ.वृषाली पाटील, सविता सारिचंद जाधव, तेजन्विनी अजय बढे, हिरकरी विकास पाटील, वंदना रवींद्र महाजन,वैशाली सिद्धार्थ मेढे,गजाला तबस्सुम कमालोध्दीन यांची उपस्थित होती.

    या महिलांचा केला सन्मान-
    कार्यक्रमात योगा प्रशिक्षक स्वाती माधव गवई,महिला उद्योजिका प्रतिभा अरुण पाटील,नलिनी चौधरी फैजपूर,वैशाली किशोर सरोदे न्हावी,शालिनी युवराज कोलते न्हावी,होमगार्ड सुलभा चंद्रकांत तळेले, देवका नरेंद्र पाटील न्हावी, शुभांगी अरुण महाजन, आशालता लीलाधर राणे, अश्विनी योगेश कोळी यांचा तर हरी कृष्णा सत्संगी महिला ग्रुप फैजपूर,युवा क्रांती पोलीस मित्र ग्रुप फैजपूर,भक्ती महिला मंडळ फैजपूर या तीन महिला मंडळांचा सन्मान करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Yaval : ८ वर्षीय ओमने पार केले अडीच तासांत १७ किमी सागरी अंतर

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.