कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच

0
11

साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी

 कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे. पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. या विजयानंतर धंगेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला नव्हता. सगळ्या पक्षामुळे भाजप निवडून येत होता. ही निवडणूक जनतेने  हातात घेतली होती. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाला आहे. कसबा भाजपचा गड नाही तर हा गड जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली.

या विजयाचं श्रेय मी कोणत्या नेत्याला नाही तर फक्त मायबाप जनतेला देतो. या जनतेनंच मला निवडून आणलं आहे. कसबा मागील अनेक वर्षे  भाजपचा बालेकिल्ला आहे.  त्यामुळे ही निवडणूक सोपी नव्हती. मात्र पहिल्या दिवसापासून विजय मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले होते. ही निवडणूक सोपी नव्हती, मात्र जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि सोपी केली, असेही धंगेकर म्हणाले.

चारचाकीत मी जात नाही; कारण चारचाकीने सगळीकडे जाणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून मी दुचाकीने फिरतो. हा धंगेकर आमदार झाल्यावरही बदलणार नाही. जनतेसाठी हा त्यांचा रवीभाऊच राहणार असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here