साईमत लाईव्ह प्रतिनिधी
वडापाव हा सर्वसामान्य ते सेलेब्रिटीपासून सगळयांचा एकदम आवडता पदार्थ आहे .आणि आजच्या दैनंदिन जीवन चालत बोलता खातायेणार एकदम सोपा पदार्थ म्हणजे वडापाव, आज हा पदार्थ देशात सर्व ठिकाणी मिळतो, आणि आता या वडापाव मध्ये किती न काई नवीन प्रकार लोक आता बनवायला लागले. पण तुम्हाला माहित आहे का या वडापाव चा जन्म कुठे झाला व कोणी केला. चला त मग जाणून घेऊया वडापाव चा जन्म कसा झाला व कोणी केला.
वडापावचा जन्म हा मुंबईत अशोक वैद्य यांच्या सुपीक डोक्यातून १९६६ मध्ये झाला. दादरच्या स्टेशनजवळ चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी १९६० साली वडे , पोहे विकण्याचे दुकान सुरु केले होते. १९६६ मध्ये त्यांनी ऑम्लेट पावचा व्यवसाय बघून त्यांनी एक युक्ती लढवली. एक पाव त्यामध्ये बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं. आणि हा प्रयोग करून पहिला न मग काय लोंकानी जाम जोरात या पदार्थ पसंती दिली. आणि मग तिथून झाला वडापाव चा जन्म. झटपट पोट हि भरता आणि हात ही जास्त खराब होत नाही. चालत चालत कोणीही हा पदार्थ एकदम आरामात खाऊ शकत. किश्याला पण जास्त झळ न बसणारा हा पदार्थ सर्वसामान्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला आणि तिथूनच वडापावचे नाव सर्वांच्या थोडी येऊ लागले. वडापाव विक्रीतून उत्पनाचे साधन मिळत असल्याने बाळासाहेब ठाकरेंनी तरुणांना वडापाव विक्रीचा व्यावसाय सुरु करण्याचे आवाहन सुद्धा केले होते. या घटनेला ५७ वर्ष झाली. आज वडापाव हा देशभरात अनेक ठिकाणी मिळू लागला आहे. आणि या पदार्थची एक वेगडीच ओळख निर्माण झाली आहे