साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
आपल्या लेखणीच्या बळावर सतत समाजासाठी अहोरात्र झटणारे बहुतांश पत्रकार वेळेवर स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळी किरकोळ व्याधी अथवा आजारांकडे दुर्लक्ष होत जाते. त्याचे वेळेवर निदान केले जात नाहीत.त्यामुळे मोठे आजार वाढण्याची शक्यता असते.या परिस्थितीची जाणीव ठेवत पहिल्यांदाच चाळीसगाव बापजी जीवनदीप हॉस्पिटलच्यावतीने डॉ. संदीप देशमुख व त्यांचे मित्र परिवारातील तज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांसाठी राबविलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम प्रेरणादायी असल्याच्या भावना ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी व्यक्त केल्या.
डॉक्टरांनी राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुकही केले.
पत्रकारांनी आपले संघटन वाढवून आर्थिक सक्षमीकरणावर देखील भर द्यावा सल्ला त्यांनी यावेळी दिला.त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्यासह आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यकडे देखील लक्ष देण्याचा पसल्ला त्यांनी दिला. तसेच येणाऱ्या काळात प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांसाठी स्वतंत्र वेलफेअर फंड निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
चाळीसगाव प्रेस क्लब, बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल व संत गाडगे महाराज परिट सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने,संत गाडगे महाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथी निमीत्ताने मंगळवार दि.२० रोजी बापजी हॉस्पीटल येथे पत्रकारांसह कुटुंबीयांचे सपत्नीक मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ९६ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यात ईजीसी, ब्लड ऑक्सीजन ,बॉडीवेट , डोळे ,स्थुलपणा , ब्लड शुगर ( रक्तातील साखर ) , फुफ्फुसाची तपासणी , रक्तदाब , बॉडीफॅट , इलेक्ट्रो मॅग्नेटिक,बसीबीसी,लेझर थेरपी आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी डॉ.संदीप देशमुख,डॉ.शैलेंद्र महाले , सुधन्वा कुलकर्णी, हर्षल सोनवणे,कल्पेश सोनवणे , संदीप साहू ,सतिष मिश्रा, उमेश जाधव आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. आशिष राठोड यांनी कुटुंब व्यवस्था तर डॉ. सतिष मिश्रा यांनी चाळीसीनंतर हाडांची घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.संदीप देशमुख यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या उद्देश व हेतू सांगितला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोवेंकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामलाल चौधरी,कार्यध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी,सचिव गफ्फार शेख,ज्येष्ठ पत्रकार संजय सोनार, भिकन वाणी,देविदास पाटील नारायण जेठवाणी,गणेश पवार सूर्यकांत कदम,मुराद पटेल,कुणाल कुमावत स्वप्निल वडनेरे,जिवन चव्हाण रनधिर जाधव, मयूर अमृतकर, आकाश धुमाळ,आनंद गांगुर्डे सोजीलाल हाडपे,रविंद्र कोष्टी खेमचंद कुमावत, किशोर शेवरे, विजय देवरे, तसेच परिट सेवा मंडळाचे उपाध्यक्ष कैलास मांडोळे तालुका अध्यक्ष नथा रावजी रावते माजी अध्यक्ष उत्तम जाधव सामाजिक कार्यकर्ते मुकेश नेतकर अशोक जाधव विनायक ठाकरे यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी सौजन्य म्हणून डॉ.संदीप देशमुख सचिव स्व.वामनराव देशमुख एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन चाळीसगाव तसेच स्वागत मेडिकलचे संचालक रवींद्रभाऊ शिरोडे यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन प्रेस क्लबचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले.आभार पत्रकार भिकन वाणी यांनी मानले.