साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
राज्यस्तरीय चौथी मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा व मिनी ऑलम्पिक पात्रता स्पर्धा बालेवाडी क्रीडा संकुल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत प्रथम धावणे नंतर शूटिंग व जलतरण असे तीन प्रकार होते. या स्पर्धेत पोलीस जलतरण तलाव येथील आठ जलतरणपटू यांनी भाग घेऊन यश मिळवले.
स्पर्धेसाठी निवड झालेले 19 वर्षाखालील मुले :- तलाह सिद्दिकी चौथ्या स्थानी, अमेय नगरकर पाचव्या स्थानी, हर्षवर्धन महाजन आठव्या स्थानी, आयान शेख नव्या स्थानी., 19 वर्षाखालील मुली :- धनश्री जाधव पाचव्या स्थानी.,17 वर्षाखालील मुले :- ओम चौधरी तृतीय स्थानी ., 17 वर्षाखालील मुली :- लाजरी खाचणे चौथ्या स्थान, जानवी महाजन पाचव्या स्थानी.
सर्व जलतरणपटू यांची पुढील महिन्यात बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या मॉडर्न पेंटाथलॉन ऑलम्पिक स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे. तसेच मिनी ओलंपीक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या संघास प्रशिक्षक म्हणून जयंत चौधरी, सुरज दायमा टेक्निकल ऑफिशियल म्हणून कमलेश नगरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या संघाचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी अभिनंदन केले.