कजगाव लोकनियुक्त सरपंचसाठी चौरंगी लढत, सरपंच पदासह सहा वार्डातील १६ सदस्य पदासाठी ४० उमेदवार रिंगणात

0
19

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे अपेक्षेप्रमाणे इच्छुकांची संख्या पाहता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते त्यामुळे आता माघारींनतर सर्वच चित्र स्पष्ट झाले असून एकूण ८५ दाखल अर्जांपैकी एकूण ४४ अर्ज माघार झाल्याने व एक अर्ज पात्र निकषात न बसल्याने व एक जागा बिनविरोध झाल्याने आता सतरा जागेसाठी चाळीस उमेदवार रिंगणात आहेत तर कजगाव लोकनियुक सरपंच साठीची निवडणूक चौरंगी होणार आहे.

कजगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे पहिलेपासूनच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण बारा उमेदवारांनी अर्ज भरले होत मात्र आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक आता चौरंगी होणार आहे लोकनियुक्त सरपंच पदासाठी विद्यमान सरपंचपती दिनेश पाटील, माळी समाजाचे नेते रघुनाथ महाजन,भाजपच्या अँड वसुधा पाटील,छावा संघटनेचे तालुका प्रमुख लालसिंग पाटील यांच्यात ही चौरंगी लढत होणार आहे तर सदस्य पदासाठी सहा वार्डातून सोळा जागेसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे सदस्य पदासाठी ३६ व लोकनियुक्तसाठी चार असे एकूण ४० उमेदवार रिंगणात आहेत तर भिकुबाई चंद्रसिंग पाटील ह्या महिला उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे सोळा सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच अश्या सतरा जागांसाठी ही पंचवार्षिक निवडणून पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here