साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
येथील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोयगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक तथा शहर प्रमुख संतोष बोडखे,हर्षल काळे,गजानन कुडके, राजू दुतोंडे,लतिफ शहा, अमोल मापारी, संदीप सुरडकर, कदीर शहा, मंगेश सोहणी, किशोर मापारी, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.