साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी
कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अध्यात्म शिरोमणी संत जगदगुरू जनार्दन स्वामींच्या ३३ व्या पुण्यमरणाचे आयोजन दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत करण्यात आले होते. तब्बल आठ दिवस हा भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक ५ रोजी कार्यक्रमाची सांगता असल्याने तब्बल एक लाख भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमात आठ दिवसात लाखो भाविकांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व परमपूज्य बाबाजींचे आशीर्वाद घेतले तब्बल आठ दिवस कथा प्रवचन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संपूर्ण कार्यक्रम हा १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला आठ दिवसात अनेक वेळा शांतिगिरी महाराजांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व भविकांना मार्गदर्शन केले
हजारो अनुष्ठांनार्थी भाविकांनि तब्बल एक आठवडा मौन धारण करून अनुष्ठानात सहभाग घेतला यावेळी साधारण पंधरा ते वीस हजार भाविकांनि दररोज भेट दिली.
आज आठ दिवसानंतर कार्यक्रमाची सांगता असल्याने तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी ज्या ठिकाणी जपानुष्ठान सोहळा पार पडला त्या ठिकाण पासून दोन्ही बाजूंनी तब्बल दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांच्या रांगा दिसून आल्या धुळे जळगाव व अन्य जिल्ह्यातून भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी सांगता कार्यक्रमाला तब्बल सव्वालाखाहून अधिक भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज व्यक्त केली जात आहे त्यामुळे संपूर्ण परीसर बाबाजीमय झालेला दिसून आला.
“”‘:शिस्तबद्ध कार्यक्रमाचे अनेकांचे वेधले लक्ष
दरम्यान अत्यंत भव्यदिव्य होणाऱ्या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागले होते एवढा मोठा ऐतिहासिक कार्यक्रम अनेकांचे लक्ष वेधून घेत होता त्यात अनेकांनीं आपल्या शिस्तीचे दर्शन दाखवले एवढा मोठ्या कार्यक्रमात वाहनांची व्यवस्था महिला पुरुषांच्या स्वातंत्र रांगा आदी गोष्टींमुळे मोठी शिस्त यावेळी दिसून आली अनेक जय बाबाजी स्वयंसेवक तासंतास सेवेत रात्रंदिवस दिसून आले तर पोलीस प्रशासनाने देखील महत्वाची भूमिका बजावली भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तब्बल आठ दिवस देण्यात आला तर आरोग्य विभागाच्या वतीनेही कार्यक्रमस्थळी सेवा दिली तसेच प्रशासनातील विविध विभागांनी सेवा दिली होती.