साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी
कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गोंडगाव येथे अत्यंत बहुप्रतीक्षेत असलेल्या संत जगदगुरू जनार्दन स्वामी यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणानिमित्त होत असलेल्या राष्ट्रनिर्मान धर्म सोहळ्याला आज २८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे हा कार्यक्रम ५ डिसेंबर पर्यंत होणार आहे.
सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम व उत्साहात ह्या बहुप्रतीक्षेत असलेल्या सोहळ्याला सुरुवात झाली जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडत आहे
१००८ स्वामी शांतिगिरजी महाराज यांचे हेलिकॉप्टर द्वारे गोंडगाव नगरीत आगमन झाले अत्यंत वाजत गाजत ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले सुरुवातीला हेलिकॉप्टर मधून कार्यक्रम स्थळाची पाहणी व फेरफटका शांतिगिरीजी महाराजांनी मारला हजारो भाविक हे जपानुष्ठानासाठी बसले आहेत संपूर्ण आठ दिवस विविधी कार्यक्रम पार पडणार असून मोठया प्रमाणावर यज्ञ मंडप व विविध तयारी करण्यात आली आहे.
“”‘:सजवलेल्या बग्गीतून बाबाजींची मिरवणूक
राज्यात वेरूळ पुणतांबा ओझर व गोंडगाव येथे अश्या चार ठिकाणी जनार्दन स्वामींच्या ३३ व्या पुण्यस्मरणा निमित्त होत असलेल्या राष्ट्रनिर्मान धर्म सोहळ्याच्या प्रत्येक बाबीकडे स्वामी शांतिगिरी महाराजांचे लक्ष असून थेट हेलिकॉप्टर द्वारे ते प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत गोंडगाव येथे हेलिकॉप्टर ने आगमन झाल्यानंतर खास बग्गीतून त्यांची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत हजारो भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.