शिरसाळा मारोतीरायाच्या चरणी अडीच किलो चांदीची गदा अर्पण

0
32

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी

मार्गशीर्ष महिन्याचा शुभारंभ झाला असून या महिन्यात शिरसाळा मारोती येथे मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजेरी लावतात. ईच्छा पुर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात.

मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शनिवारी भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील गोपीभाऊ राजपुत यांनी ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत अडीच किलो चांदीचा गदा शिरसाळा मारोतीराया चरणी अर्पण केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण बजरंग भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल, शिवसेना जळगांव महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे , नगरसेवक तथा साईसेवक पिंटुभाऊ कोठारी , शेखर भाऊ सोनवणे यांच्यासमवेत साई मित्र परिवार मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here