साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरीकांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शनिवारी शहीद दिनानिमीत्त रक्तदान शिबिर आयोजीत करून अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यातून 44 बाटल्या रक्त संकलीत झाले. यासाठी जीवन सुरभी ब्लड बँकेेचे सहकार्य लाभले.
देशाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शहीद दिनानिमीत्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव जॉगिंग असो. व चाळीसगाव सायकल गृपच्या वतीने पोलीस स्टेशन आवारात रक्तदान शिबिर आयोजीत केले होते.प्रारंभी 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एन के वाकलकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, प्रितेश कटारिया, दीपक देशमुख, केतन बुंदेलखंडी, टोनी पंजाबी, लीलाधर पाटील, सुरेश मंधानी, चेतन पल्लण, पोना. विनोद भोई, डॉ. निलेश भोसले, डॉ. दत्ता भदाणे, राजेंद्र वाणी, हर्षल पाटील, लीलाधर पाटील, अप्पा भालेराव, भूषण कायस्थ, हॉटेल सह्याद्रीचे संचालक गोकुळ पाटील यांच्यासह महाविद्यालयीन विद्याथ्यार्ंंनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉ. दत्ता भदाणे,हरीष बरगल, रविंद्र जाधव, कमलेश कापडे, पंकज पेंभरे यांचे सहकार्य लाभले.