साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
नानसो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सतिष पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.राजेंद्र भोसले यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले. शाळेतील शिक्षिका श्रीमती.सरला महाले यांनी संविधान वाचन केले. श्री.राजू पाटील व श्रीमती अर्चना मोरे यांनी संविधान दिनाविषयी माहिती सांगितली. तसेच शाळेत संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनोद पाटील तर आभार श्री.रमाकांत कापडणिस यांनी व्यक्त केले.