बीएचआर व शालेय पोषण आहार प्रकरणात पुढे नेमकं काय होणार?ः उत्सुकता शिगेला

0
25

जळगाव ः प्रतिनिधी
येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मुक्ताईनगरच्या मोठ्या प्रमाणात फेर्‍या होत असल्याने बी. एच. आर. आणि जिल्हा परिषद शालेय पोषण आहार प्रकरणात नेमकं पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून भाजपातून राष्ट्रवादी पक्षाकडे माजीमंत्री एकनाथराव खडसे आल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात राजकीय भूकंप झाला. यानंतर एकनाथराव खडसे यांनी बीएचआर प्रकरण उघड केल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या घोटाळ्याकडे लागले आहे.
हे प्रकरण उघडकीस येते न येते तोच जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार प्रकरणातील घोळ व त्यातील भ्रष्टाचार सुद्धा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उघड केला आहे . यामुळे जिल्ह्यासह राज्यात भूकंपाचे धक्क्यावर धक्के सुरू आहेत.यामुळे मात्र आता या प्रकरणांमध्ये ज्यांची अडकण्याची शक्यता आहे ते स्वतः त्याचप्रमाणे इतरांना हाताशी धरून माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here