साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यांच्या “विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना”, अंतर्गत बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज यांच्या वतीने व जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, चाळीसगाव, इंडियन मेडिकल असोसिएशन चाप्टर चाळीसगाव. यांच्या सहकार्याने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वैद्यकीय शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा आयएमए चाळीसगाव चे अध्यक्ष मा. डॉ. विनोदजी कोतकर हे होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये चाळीसगाव नगरीतील सुपरिचित तज्ञ डॉक्टर डॉ. सुजित वाघ अध्यक्ष जेपीए चाळीसगाव , डॉ. सुधनवा कुलकर्णी, डॉ. प्रवीण भोकरे, डॉ. प्रशांत सिनकर, डॉ. हर्षल सोनवणे, डॉ. किरण कुमार मगर, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. अभिमन्यू राठोड, डॉ. शहाजीराव देशमुख, डॉ. भरत सुतवणे, डॉ. रोशनी सुतवणे, डॉ. गिरीश मुंदडा, डॉ. महेश वाणी सचिव जेपीए चाळीसगाव, डॉ. एस. के. निकुंभ, डॉ. भाग्यश्री शिनकर, डॉ. प्रवीण चव्हाण. आदींची विशेष उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील जवळपास 458 विद्यार्थी तथा विद्यार्थिनी सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांची यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या आयोजनामागे विद्यार्थ्यांनी आरोग्याच्या बाबतीत सदैव जागरूक राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हा होता. विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सदृढ राहावे तरच विद्यार्थी उत्तम प्रगती करू शकतो अशीच भावना या शिबिरामागे होती.
या शिबिराप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही . बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. पी. एस. बाविस्कर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे यांची उपस्थिती होती. या शिबिराचे संयोजन प्रा . अभिषेक धांदे, डॉ. जामतसिंग राजपूत, डॉ. दिपाली बंसवाल यांनी केले होते तर डॉ. ए. बी. सावरकर, डॉ. ए. डी . शेळके, प्रा. एम. एस. पाटील, प्रा. एम. व्ही. चुडे, प्रा. डी. एन . उंदीरवाडे, प्रा. व्ही. यू. पवार, प्रा. प्राची भाटेवाल, प्रा. आर. एस. मोरे, प्रा. पूजा ठोके, प्रा. सृष्टी भावसार, प्रयोगशाळा सहाय्यक हेमंत गायकवाड. याशिवाय सेवक वर्ग- श्री शुभम पाटील, श्री धनंजय निकुंभ, श्री संजय मोरे, श्री नरेंद्र देशमुख, श्री मधु जाधव, श्री दिनेश गायकवाड. आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.