साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील वडजी येथील सिद्धार्थ प्रकाश सपकाळे वय २५ या पंचवीस वर्षीय तरुणाने भागवत इंगळे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीवर दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना दुपारी बाराचे सुमारास उघडकीस आली. ही आत्महत्या सकाळ ते बारा वाजेच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे. मयत सिद्धार्थ कुटुंबातील सर्वात लहान होता त्याचे पश्चात आई ,वडील, मोठा भाऊ व विवाहित बहिणी असा परिवार आहे.या घटने बाबत मयताचा भाऊ विनोद प्रकाश सपकाळे याचे खबरी वरून बोदवड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ.वसंत निकम हे करीत आहेत.