साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्र. 13 मधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. प्रभाग क्र.3 मध्ये असणारे लीलावती अपार्टमेंट चौक ते गाडगेबाबा चौक , हिरकणी डेअरी ते संभाजी चौक , प्रसाद अपार्टमेंट ते सेंट टेरेसा स्कूल शिरसोली रोड ला कनेक्ट पर्यंत , नेहरू नगर चौक ते चंद्रलोक अपार्टमेंट , आनंद नगर स्टॉप ते स्टेट बँक कडे आणि मोहाडी फाटा ते रायसोनी नगर पर्यंत या मुख्य रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थे संदर्भात परिसरातील नागरिकांनी महानगपालिकेला निवेदन दिले.
या खराब रस्त्यांमुळे आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय . तसेच आरोग्याच्या अनेक समस्या देखील उद्भवत आहे. वारंवार या रस्त्यावर छोटे मोठे अपघातही घडत असतात. त्यामुळे मनपाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्याचे काम करावे असे निवेदन नागरिकांनी दिले. यावेळी उदय पवार , प्रतिभा सूर्यवंशी , सविता माळी, हर्षा पवार यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.