यावल शहरात जुगारासह पन्नीची दारू सुरू ; पोलीस अधीक्षकांचे आदेशाची पायमल्ली

0
28

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

वृत्तपत्रातून बातमी आल्याने पोलीस अधीक्षकाच्या आदेशाची पायमल्ली करून फक्त एक दिवस बंद पाळुन यावल शहरात ठिकठिकाणी जुगार व पन्नीची दारू सुरू झाली.

यावल शहरात परिसरात जुगारामुळे पन्नीच्या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, असून बनावट केमिकल युक्त पन्नीच्या दारूमुळे तसेच बनावट देशी गावठी दारूमुळे अनेक युवक आणि नागरिकांचे अल्पावधीत निधन झाले. आणि बरेच युवक आजही मृत्यूच्या मार्गावर उभे आहेत.शहरात बोरावल गेट पासून इतर ठिकठिकाणी पन्नीची दारू अनधिकृत पणे खुलेआम विक्री होत आहे,या गंभीर समस्या व प्रकाराकडे,युवक वर्गाच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनाकड़े समाज शासन प्रत्यक्ष बघत असून अर्थप्राप्तीमुळे दुर्लक्ष करीत असल्याने समाजात पीडित कुटुंबांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

समाजात विशेष करून महिलांमध्ये शासनाविषयी लोकप्रतिनिधी विषयी संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असल्याने पोलीस अधीक्षक जळगाव,आणि गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव व स्थानिक पोलिसांनी अवैध पन्नी दारू व अवैध जुगार अड्ड्यांवर एकाच वेळेला धाडी टाकून कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावल शहरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here