साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकाशी संवाद साधण्याकरिता आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे
तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुप्रियाताई सुळे यांचा भव्य असा पुष्पहार घालून तुळजापूर नगरीमध्ये त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ शिंदे, परिवहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सुरेश बिराजदार, भुम-परांड्याचे मा.आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ.वैशालीताई मोटे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नंदकुमार गवारे, जिल्हा सचिव विजय सरडे, माजी नगराध्यक्ष नळदुर्ग शफी शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक व प्रसिद्ध प्रमुख बबन गावडे, ज्येष्ठ नेते खंडोजी जाधव, शहराध्यक्ष अमर चोपदार, गोरख पवार, ज्येष्ठ नेते दिलीप मगर, तुळजापूर युवक अध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष नितीन रोचकरी, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, रोहित चव्हाण, समर्थ पैलवान, शशी नवले, बाळासाहेब चिखलकर, राजाभाऊ शिंदे, राजाभाऊ गायकवाड, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, आप्पासाहेब पवार यांच्यासह तुळजापूर येथील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आई तुळजाभवानी आईचे पुजारी सुदर्शन पवार यावेळी उपस्थीत होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे यांनी आई तुळजाभवानीचे तुळजापूर हे तिर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री यांना शिफारस करून तुळजापूर तिर्थक्षेत्र हे भारताच्या नकाशावर आणावे मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे व मिळवून द्यावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.