साईमत लाईव्ह धानोरा प्रतिनिधी
बर्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील किनगाव जवळ विजमंडळाचे कार्यालयासमोर असलेल्या पुला जवळील खड्ड्यांमध्ये १७ रोजी रात्री साडेआठ वाजता एरंडोल तालुक्यातील हनुमंत खेडा येथील तरुणाची मोटरसायकल खड्ड्यांमध्ये ् पडल्याने सदर तरुण जबर जखमी झाला होता. त्याच्या नाका व कानातुन रक्त प्रवाह झाल्याने त्या्ला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्या घटनेची दखल तालुक्यातील कोणत्याही अधिकारी व पदाधिकारी नी घेतलीं नाही. रात्रीच सदर तरुणांचा अपघात झाला.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या नाकावर टिच्चून येथील आठ ते दहा तरुणांनी येथिल अपघातास कारणीभूत असलेला खड्डा आजच खडी माती टाकून तात्पुरता का होईना दुरुस्त करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.यासाठी किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र आबाजी पाटील , विशाल सुभाष पाटील , स्वप्निल महाजन , गजानन गायकवाड , किशोर कोळी ,गौरव कोळी , आदित्य पाटील ,मयुर पाटील ,पप्पु रल आदि तरूण उपस्थित होते.