कोरोनाग्रस्तांसाठी पंधरा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्र

0
13

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजातील गरजू रुग्णांसाठी १५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मशीनचे लोकार्पण रविवारी शहरातील मंडोरा टॉवर येथे माहेश्वरी समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी सरकारी, खासगी यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. शासन, प्रशासनातर्फे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय माहेश्वरी समाजाने घेतला. मंडळाने १५ ऑक्सिजन मशीन नागरिकांना उपचारासाठी अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहेत. या ऑक्सिजन मशीनसाठी गरजू रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी रुपेश काबरा (९४२०५५९६००), विशाल तापडिया (९४२०३८८८५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमासाठी विष्णूकांत मणियार, यशपाल मंत्री, बालाजी भजनी मंडळासह शहरातील आठ झोनमधील आदर्शनगर, पिंप्राळा, अयोध्यानगर, नवीपेठ परिसरातील समाजबांधव नियोजन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here