Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’बेकायदेशिर संघटना पुढील पाच वर्षांसाठी बंदी : मोदी सरकारचा निर्णय
    क्राईम

    ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’बेकायदेशिर संघटना पुढील पाच वर्षांसाठी बंदी : मोदी सरकारचा निर्णय

    SaimatBy SaimatSeptember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था
    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असे केंद्राने म्हटले आहे.

    केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सीमी’चे सदस्य असल्याची माहिती दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहे.

    रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन ऍण्ड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही पीएफआयबरोबर बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घालण्यात आली आहे.
    मंगळवारी तपास यंत्रणांनी या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. यात महाराष्ट्रासह सात राज्यांत छापेमारी करण्यात आली. दिवसभरामध्ये तब्बल १७० जणांना अटक करण्यात आल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास ही संघटना बेकायदेशीर असल्याची घोषणा केंद्रातील मोदी सरकारने केल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

    मागील गुरुवारी ‘एनआयए’ने १५ राज्यांत छापे घालून ‘पीएफआय’चे १०६ कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली होती. या कारवाईच्या दुसर्‍या टप्प्यात पोलिसांसह तपास यंत्रणांनी मंगळवारी महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांत दिवसभर छापे घातले. आज पहाटे   एएनआय्ने केलेल्या ट्वीटनुसार, ‘‘केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांना बेकायदेशीर घोषित केले आहे. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू होत असून तो पुढील पाच वर्षांसाठी असेल.’ राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) पोलिसांनी मंगळवारी पुणे, नांदेड, औरंगाबाद, नगर, संगमनेर, मिरज, ठाण्यात छापे टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कालच दिवसभरात महाराष्ट्र आणि आसाममध्ये या संघटनेच्या प्रत्येकी २५ जणांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५७ जणांना, दिल्लीत ३० जणांना, मध्य प्रदेशात २१ जणांना तर गुजरातमध्ये पीएफआयच्या १० जणांना अटक करण्यात आली. कर्नाटकमध्येही काही जणांवर कारवाई करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.