साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
कजगाव तालुका भडगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रम मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. अतिक्रमण धारकांनी स्वताच आपले अतिक्रमण काढून घेतले, याबाबत सविस्तर वृत्त असे की कजगाव येथील बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी कजगाव येथील भूषण पाटील यांनी गेल्या वीस दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या मागणीचा विचार करत कजगाव बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात बाबत हालचाली सुरू झाल्यानंतर बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात आले.
अतिक्रम काढण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त कजगाव येथे पोहोचल्यानंतर अतिक्रमण धारकांना बारा वाजेपर्यंत अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले त्याप्रमाणे अतिक्रमण धारकांनी स्वतहून आपल्या अतिक्रम काढून घेत बस स्थानक समोरील पटांगण मोकळे केले , मात्र काही अतिक्रमण धारकांना बिना नोटीस बजावता अतिक्रमण काढण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत होती , अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागण्यात आला होता. यात भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे ए . एस. आय राजेंद्र पाटील ए .एस . आय कैलास गीते जिजाबराव पवार पोलीस नाईक नरेंद्र विसपुते हवालदार पंचशीला निकम हवालदार शमीना पठाण व कजगाव ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.