साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी
येथील सीएनजी ग्रुप, चोपडा पिपल्स बॅक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, चोपडा तालुका व्यापारी महामंडळ व इतर सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरात होणार्या कार्यक्रमाप्रमाणेच या उत्सवाचे आयोजन होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील व तालुक्यातील जनतेने या उत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा व कधीही न घेतलेला अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उत्सवात सुप्रसिध्द गायक अभिदत्त, शांभवी ठाकूर, आर्यन तिडके, सागर केडुंरकर, आकाश झवेरी, जतिन उदासी, दिवेश राणा, आवेश दरबार, वरूण शर्मा (चु-चा) येत आहेत. सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर पर्यंत संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार आहे. दररोज प्रत्येक तासात दांडियात सहभागी होणार्यांसाठी प्रत्येक तासांत तीन, एका दिवसात नऊ बक्षिसे असे नऊ दिवसांमध्ये एकुण ८१ बक्षिसे देण्यात येणार आहे. सदर उत्सवात खवैयांसाठी फूड झोन व लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले झोन सुद्धा उपलब्ध असणार आहे असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले.