साईमत लाईव्ह यावल तालुका प्रतिनिधी
दुर्मिळ असलेला पोवळा जातीचा विषारी लहान साप यावल तालुक्याच्या सीमेवर तसेच रावेर तालुक्यातील ’रिधोरी’ गावात आढळून आल्याने तेथील स्थानिक सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्याचे रेस्क्यू केले.
पोवळा हा आपल्या परीसरात आढळून येणार्या विषारी सापातील सर्वात लहान सांप असून हा साप तांबुस,तपकिरी रंगाचा असतो.या सापाच्या शेपटीला दोन काळे पट्टे असतात.असे काळे पट्टे बिनविषारी काळतोंड्या या सापामध्ये आढळुन येत नाही.पोवळा या सापाला डिवचले असता हा शेपटीची गुंडाळी करुन शेंदुरी/केशरी रंग प्रदर्शित करतो.असा हा पोवळा जातीचा साप रिधोरी गावात आढळून आल्याने सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्याचे रेस्क्यू केले.