Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»टीका करणांना कामातून उत्तर मिळणार : ना. गुलाबराव पाटील
    राजकीय

    टीका करणांना कामातून उत्तर मिळणार : ना. गुलाबराव पाटील

    SaimatBy SaimatSeptember 19, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी : 

    राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काही जण टीका करत आहेत. त्यांच्या टिकेले प्रतिटिकेने नव्हे तर कामातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिनांक २० रोजीच्या जिल्हा दौर्‍याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाळधी येथील नियोजीत विश्रामगृहाचे भूमिपुजन करणार असून त्यांच्याच हस्ते महात्मा गांधी चौकात रिमोट कंट्रोलने तब्बल २२ कोटी रूपयांच्या आणि सौर उर्जेवर चालणार्‍या राज्यातील पहिल्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, कार्यकर्त्यांनी विरोधकांसोबत कोणतीही तडजोड न करता सडेतोड भूमिका घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले. तर, त्यांनी आततायीपणा करणार्‍या आपल्या काही समर्थकांचे कान देखील टोचले.

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांच्या उपस्थितीत पाळधी येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुक्ताईनगरात भव्य सभा होणार आहे. याच्या नियोजनासाठी आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल सुगोकी जवळच्या फार्म हाऊसमध्ये नियोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा हा ऐतीहासीक पध्दतीत यशस्वी होणार असल्याचे प्रतिपादन केले. आपण मंत्री झाल्यानंतर मतदारसंघात येतांना ज्या प्रकारे अचूक नियोजन करून स्वागत करण्यात आले, अगदी त्याच प्रकारे अचूक नियोजन करण्याच्या सूचना ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या. तर, आपल्याला काही जण गद्दार म्हणत असले तरी आपण त्यांना कामातून उत्तर देणार असल्याचे सांगितले. काही कार्यकर्ते ही भोळेपणाने विरोधकांशी सलगी दाखवत असल्यामुळे बर्‍याचदा संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असते. यामुळे विरोधकांशी कोणत्याही स्थितीत कॉंप्रमाईज करू नका, त्यांना वेळ पडल्यास जशास तसे उत्तर द्या ! असे ना. गुलाबराव पाटील यांनी बजावले.

    याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. काही मंडळी हे सीझनल पुढारी असून ते आता सात वर्षांनी फिरू लागले असल्याची टीका त्यांनी केले. विरोधक टीका करत असले तरी त्यांची कुवत आपल्याला माहिती असल्याचा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी मारला. तर, काही जण दुटप्पी भूमिका घेत असल्याने ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली.

    दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बायपास रोडवरून पाळधी येथे येणार असून त्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. तर गावातील महात्मा गांधी चौकात त्यांच्या हस्ते २२ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात येणार आहे. सौर उर्जेवर चालणारी ही राज्यातील पहिली मोठी पाणी पुरवठा योजना आहे. यानंतर मुख्यमंत्री थोडा वेळ उपस्थितांना संबोधीत करतील. यानंतर पाळधीहून जळगावातील विविध चौकांमध्ये मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत होणार आहे. तर, भुसावळ येथून १-२ हजार मोटारसायकलस्वारांची रॅली त्यांच्या ताफ्यासोबत मुक्ताईनगर येथे जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची ही सभा ऐतीहासीक ठरणार असून याला जिल्हाभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून जळगाव ग्रामीणमधून देखील मोठ्या प्रमाणात समर्थक जाण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

    मेळाव्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला आणि मतदार संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

    यावेळी मनोगतात डॉ.कमलाकर पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, भगवान महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी भक्कमपणे आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

    बैठकिचे रूपांतर मेळाव्यात झाले. याजळगाव ग्रामीण मतदार संघाच्या मेळाव्याला माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उप तालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, धोंडू जगताप, रवींद्र चव्हाण सर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार , जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती जनाआप्पा पाटील, नंदलाल पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी, उपसभापती प्रेमराज पाटील, डॉ. कमलाकर पाटील, डी.ओ. पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, गोपाल जीभाऊ पाटील, भगवान महाजन , राजेंद्र पाटील, किशोर पाटील, तुषार महाजन, मुकेश सोनवणे, साहेबराव वराडे,
    धरणगाव शहराचे गट नेते पप्पू भावे, नगरसेवक विजय महाजन, अभिजीत पाटील, वाल्मिक पाटील, हेमंत चौधरी, संतोष महाजन, बाळू गोलांडे, रवि कापडने, तोसिफ पटेल, भूषण पाटील, जितू नारखेडे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक , पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पं स तिचे माजी सभापती मुकुंदराव ननवरे यांनी केले. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी प्रास्ताविकात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दौरा विषयीची माहिती सविस्तरपणे विशद केली तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Girish Mahajan on Raj thackeray : राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका – “निवडणूक आली की मराठी अस्मिता आठवते!”

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.