साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी
सोयगाव तालुक्यातील माळेगाव(पिप्री) येथील विवाहित महिला दि. ०३ सप्टेंबर २०२२ ला आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतातून कुणालाही न सांगता निघून गेली आहे १३ दिवस उलटूनही अद्यापही ही विवाहित महिला घरी परतली नसून सोयगाव पोलीस याबाबत तपास करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की सौ.वैशाली रामेश्वर पाटील वय(२३) राहणार माळेगाव(पिप्री)ता.सोयगाव ही विवाहित महिला दि.३ सप्टेंबर सकाळी १०.३० मी. शेतात कामाला गेली व शेतातून परस्पर कुणालाही न सांगता निघून गेली सदरील महिलेला १४ महिन्याचा मुलगा आहे , याबद्दल तिच्या सासरच्या लोकांनी विवाहित महिलेच्या माहेरच्यांना तसेच सर्व नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली असता ती आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले त्यामुळे महिलेच्या सासरच्या लोकांनी सोयगाव पोलीस ठाणे गाठले व तिथे याबद्दल माहिती दिली व सोयगाव पोलिस ठाणे येथे याघटनेची नोंद करून पोलिस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सादिक तडवी व इतर सहकारी तपास करण्याच्या मार्गी लागले मात्र सदरील महिलेचा १३ दिवस उलटूनही तपास न लागल्याने तिच्या सासरच्या व माहेरच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे ,नेमकी ही विवाहित महिला गेली कुठे असा प्रश्न आता ग्रामस्थांना निर्माण झाला आहे या महिलेबद्दल कुणाला काही माहिती मिळाली तर सोयगाव पोलिस ठाणे येथे कळवावे असे आव्हान पोलिस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांनी केले आहे.