साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि.१६. संपूर्ण राज्यात लम्पी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले हा लम्पी हा आजाराची लागण प्रामुख्याने गाय व बैल या गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यानुसार सोयगाव तालुक्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका पशूवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
तालुक्यातील जरंडीसह परिसरात गुरांमध्ये लम्पी या आजाराचे प्रमाण वाढत असून मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरत आहे या आजाराची लागण झालेली गुरे अशक्त होत आहेत व यांच्या मुळे इतर गुरांमध्ये हा आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग व पशुपालक यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पशु संवर्धनविभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन गुरांना लम्पी रोगप्रतिकारक लसीकरण करण्यावर भर द्यावा अशी मागणी होत आहे.
जरंडी व परिसरात देखील या आजाराचा धोका वाढल्याने पशुसंवर्धन विभागाने त्वरित लसीकरण करावे अशी मागणी जरंडी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पवार,पाशु पटेल सुनील माधव, संजय पाटील,अनिल शिंदे,योगेश सुभाष पाटील यांनी व पशुपालक ग्रामस्थांनी केली आहे.