साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील मालवाहतूक वाहन धारकांकडून RTO परिवहन विभागाच्या काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दर महिन्याला १ ते ५ तारखे दरम्यान अवैध हप्ते वसूल केले जातात तसेच जे वाहन चालक हप्ते देत नाहीत त्यांच्या गाड्या जमा करून त्रास दिला जात असल्याचा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या.
दि.३ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे माल धक्क्याजवळ स्थानिक वाहतूक करणाऱ्या काही ट्रक RTO विभागाने जमा केल्या असल्याचे कळाले. मी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता संबंधित वाहन धारकांनी त्यांना होणारा त्रास माझ्याजवळ कथन केला. याबाबत मी RTO विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी या वाहनांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले मात्र तेथे उपस्थित असलेले वाहन धारक म्हणाले की केवळ आम्ही हप्ता न दिल्याने आमच्या गाड्या जमा केल्या आहेत. ज्यांनी हप्ता जमा केला मात्र कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांच्या गाड्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दर महिन्याला RTO विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे पंटर एजंट मार्फत कार्ड सिस्टम सारखे कोडवर्ड वापरून हफ्ते जमा करतात. याबाबत सर्व पुरावे, तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. RTO विभागातील खालच्या कर्मचारी पासून ते वरिष्ठ अधिकारी पर्यंत भ्रष्टाचाराचे हे सिंडिकेट असून याबाबत मी मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार करणार आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सबंधित दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
सत्ता असो वा नसो सर्वसामान्यांना नाडणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्ती विरोधात माझा लढा सुरूच राहील. माझी या माध्यमातून सर्व वाहन धारकांना विनंती आहे की आपल्याला देखील परिवहन (RTO) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असेल, अडवणूक केली जात असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधा, चाळीसगांव मतदारसंघात कुठल्याही प्रकारची लूटमार परिवहन विभागाची सहन केली जाणार नाही. आपली तक्रार व माहिती मला माझ्या कार्यालयातील 9763555544 या क्रमांकावर व्हाट्सअप करावी किंवा कार्यालयात प्रत्यक्ष भेटून द्यावी. आपले नाव गोपनीय ठेवले जाईल व आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईल, असे आमदार बोलले.