जरंडी ग्रामपंचायतच्या वतीने ४४ अपंग व्यक्तींना जारचे वाटप तसेच त्यांना मिळणार दररोज २० लिटर पाणी मोफत

0
16

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

आज जरंडी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील ४४ अपंग व्यक्तिंना(ऑनलाइन प्रमाणपत्र धारक) पाण्याच्या जार चे वाटप करण्यात आले तसेच त्यांना दररोज २० लिटर मोफत RO plant चे पाणी मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी दिली यावेळी वनविभागाअंतर्गत वन्यप्राणी यांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या तसेच मृत्यू पडलेल्या जनावरांना मदत मिळत असल्याचे व शासनाकडून निधीत मदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती सोयगाव वनविभागाचे वनरक्षक एस.एस.हिरेकर यांनी ग्रामसभेत दिली तसेच या ग्रामसभेत रोजगार सेवकपदी शिवाजी चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात यावेळी सरपंच वंदनाताई पाटील, उपसरपंच संजय गिरीधर पाटील, ग्रामपंचायत सदस्य,मधुकर पाटील,मधुकर सोनवणे, दिलीप पाटील, प्रकाश पवार, वनरक्षक एस. एस. हिरेकर ,पंचायत समिती माजी सदस्य संजीवन सोनवणे , प्रमोद स्टील होमचे संचालक प्रमोद रावणे, राजेंद्र पाटील,लिपिक संतोष पाटील,यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता जरंडी गावातील आठवडी बाजाराला मिळणार नवीन ठिकाण

गावातील आठवडी बाजार भरविण्याकरिता बाजारओटे चे काम सुरू होणार असून त्याची आज पाहणी करून मोजमाप करण्यात आले व त्याचे काम लगेच सुरू होणार असल्याने जरंडी आठवडीबाजार भरविण्यासाठी नवीन जागा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here