साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतीनिधी
कजगाव ता.भडगाव येथे कुवारी पंगतीची प्रथा ज्या महानुभाव ने घालुन दिली त्या भाईकनशा फकीर बाबाचा उरूस कार्यक्रम तसेच यात्रा,कुस्त्यांची दंगल,तमाशा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दि.२६ रोजी मुस्लीम पंच कमेटी जामा मज्जीद यांचे वतीने सम्पूर्ण गावातुन संदल मिरवणुक काढण्यात येऊन बाबाच्या दर्ग्यावर हिन्दु मुस्लीम बांधवांनी चादर चढवत एकतेचे दर्शन येथे घडले.
दिल अमीर का वतन फकीर का दे उसका भी भला ना दे उसका भी भला असे म्हणत जगाचे हित सांगणाऱ्या भाईकनशा फकीर बाबा ने अंदाजे २५० वर्षा पूर्वी कुवारी पंगतीची प्रथा घालून दिली होती.
ती प्रथा आजही कजगावकर मोठ्या श्रद्धेने चालवितात पुढे भाईकनशा फकीर बाबाने तितुर नदी काठी घनदाट जंगलात जिवन्त समाधी घेतली होती त्या काळात ते घनदाट जंगल होते या नंतर या भागात वस्ती वाढत गेली आणि बाबाचे समाधी स्थळ हिंदू मुस्लिमांचे देवस्थान बनले बाबाच्या नावाने उरूस भरू लागला हि प्रथा फार जुन्या काळापासून कजगाव कर मोठ्या श्रद्धेने पाळतात यात हिंदू मुस्लिम सहभागी होतात खऱ्या अर्थाने येथे एकोप्याचे दर्शन होते उरूस निम्मित येथे यात्रा, कुस्त्याची दंगल, बरोबरच लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात येत असते उरूस साठी येणारा खर्च लोक वर्गणीतून करण्यात येतो गावातील मंडळी संपुर्ण गाव भर फिरून यथा शक्ती मदत गोळा करून कुस्ती दंगल व तमाशा चा खर्च यातून करतात यातून काहि पैसे उरले तर ते गावातील विधायक कामा साठी वापरण्यात येतो अशा पद्धतीने बाबाचा उरूस मोठया उस्तवात साजरा केला जातो दिवस भर व रात्री उशिरापर्यंत बाबाच्या समाधीचे दर्शन गावकरी घेतात, दरवर्षी पोळ्या च्या दिवशी संदल व चादर मिरवणुक केली जाते यात सर्व हिन्दू मुस्लिम बाधव एकत्र येऊन चादर चे दर्शन घेतात व येथे दुवा पठन करतात या वर्षी चादर चा मान कजगाव येथील मेहमुद शाह यांना देण्यात आला होता.