सोयगाव पोलीस हद्दीसह बनोटी पोलीस चौकी हद्दीतील अवैध धंद्यांना लगाम लागणार का?

0
18

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी)

आगामी येऊ घातलेल्या पोळा आणि गणेशोत्सव दारूमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी सोयगाव पोलिसांचे अवैध दारू विक्रीवर लगाम घालण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी या पथकाने नांदगाव तांडा ता सोयगाव येथे गावरान(हातभट्टीची) अवैध दारू दहा लिटर कब्जात बाळगून विक्रीच्या उद्देशाने रंगेहात पकडून त्याचे कडून अंदाचे दोन हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

देवमन किसन सोनवणे वय 45 वर्ष रा.नांदगाव ता. सोयगाव असे गावरान अवैध दारूविक्री करतांना आढळून आलेल्या चे नाव असून मंगळवारी त्यास पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे नांदगाव येथे घराचे बाजूला सदर इसम अवैध दारूची विक्री करतांना रंगेहात आढळून आला आहे.त्याच्याकडून 2000/- रुपये किमतीच्या 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करण्यांत आली आहे. पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या पथकातील अजय कोळी,उपनिरीक्षक सतीश पंडित, राजू बर्डे, आदींच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.

गावरान (हातभट्टीची दारू) दारु विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी केलेली कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. तर सोयगाव -चाळीसगाव रस्त्याला लागूनच असलेल्या जरंडी, रामपुरा,बहुलखेडा, तिखी फाटा,उमरविहिरे,वरठाण,बनोटी, किन्ही वडगाव या ठिकाणी अवैध देशी दारू सुसाट आहे. दरम्यान सोयगाव पोलिसांना बनोटीकडे जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागत असून रस्त्यालगत शेड बांधून असलेल्या ढाब्यावर तसेच बनोटी, गोंदेगाव ,निंबायती येथे सर्रास पणे अवैध देशीदारू व इंग्लिश दारूची सर्रास विक्री सुरू असून पोलिसांच्या नजरेला का पडत नाही यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नुकताच सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सपोनि अनमोल केदार याना बिट जमादारांकडून अंधारात ठेवले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here